Coffee with Sakal : दहा वर्षात देशात १० कोटी रोजगार निर्मिती आवश्यक ;सुधीर मुतालीक | Sakal Media
कोल्हापूर (Kolhapur) : कोविडच्या Covid पहिल्या लाटेतून उद्योजक सावरले, पण दुसऱ्या लाटेतून सावरताना दिसत नाहीत. आता मनोबल उंचावून देशविदेशात निर्यातीसाठी असलेली मोठी संधी व्यावसायिकांनी साधली पाहिजे. छोट्या उद्योगांनी मध्यम, मध्यम उद्योगांनी मोठ्या उद्योगात जाण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे. देशात २०३० पर्यंत १० कोटी रोजगार निर्मिती करावी लागणार आहे. असे मत कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे (‘सीआयआय' ) राज्य अध्यक्ष सुधीर मुतालीक यांनी आज येथे व्यक्त केले. ‘कॉफी वुईथ सकाळ' या उपक्रमात ते बोलत होते. (व्हिडिओ- मोहन मेस्त्री)
#kolhapur #SudhirMutalik #CoffeewithSakal #covid #Job